प्रतिनिधी, सातारा : सातारा शहरालगत असलेल्या वाढे फाटा लगतच्या महामार्गावर गेल्या अनेक वर्षापासून मोठ मोठाले खड्डे पडल्याने वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच परिसरात अनेकजण अपघातात जखमी झाल्याने हे खड्डे आता मृत्यूचा सापळा बनू लागले आहेत.
सध्या सातारा शहरासह परिसरामध्ये असलेल्या पर्यटन स्थळाला अनेक पर्यटन भेटी देत आहेत त्याचबरोबर सध्या कासपुष्प पठाराला पाहण्यासाठी देखील पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे सातारा शहराच्या प्रवेशावरच महामार्गावर मोठे खड्डे पडल्याने या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. नागरिक या खड्ड्यांमुळे त्रस्त असून महामार्ग प्रशासनाने आणि सातारा जिल्हा प्रशासनाने तात्काळ हे खड्डे बुजवावे, अशी मागणी वाहन चालक करत आहेत.
