जनतेज न्युज

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याला मनसे आमदाराचा पाठिंबा

प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन दोन महिने उलटले असताना डोंबिवलीत एका खाजगी कार्यक्रमांमध्ये भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार रवी चव्हाण यांच्याकडून खड्डे व रस्त्यावरून त्यावेळेला केलेले पाप आहे ते पुन्हा धुऊन टाका अश्या प्रकारे थेट मुख्यमंत्र्यावरती टीका करण्यात आली त्याच्या टिके नंतर शिंदे गटातील नेत्यांनी ही रवींद्र चव्हाण यांना तेरा वर्षा डोंबिवलीमध्ये जे पाप केले आपली पाप झाकण्यासाठी दुसऱ्यावरती आरोप प्रत्यारोप करणं बंद करा अश्या प्रकारे प्रत्युत्तर देण्यात आले. भाजप व शिंदे गटात सुरू असलेल्या आरोप व प्रत्यारोपामध्ये आता मनसेनेही उडी मारली असून मनसे आमदार राजू पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण याच्या वक्तव्याला समर्थन देत मी काही त्यांची वकिली करत नाही. त्यांना थोडा वाव देऊन त्यांनी काम नाही केलं तर इथला स्थानिक आमदार म्हणून त्यांच्यावरती टीका करेल. परंतु, सध्या तरी मला तशी परिस्थिती दिसत नाही. रवींद्र चव्हाण जे बोलले मी त्यांचं समर्थन करतो आणि आता आपण कुठेतरी जो नशिबाचा फेरा उलटा फिरत होता तो उलटा न फिरता कुठेतरी सत्तेत वरची खुर्ची उपभोग होतोय एकमेकांची पाप कशाला धुता त्यापेक्षा लोकांची कामं करून पुण्य कमवा. त्यापुढे लोकांची दुवा तुमच्या कामी येईल अशा प्रकारे टीका करत शिंदे गटाच्या नेत्यांचे कान टोचले.