जनतेज न्युज

दूध व चिकन खाल्ल्यास लंबी सदृश्य आजार होऊ शकत नाही, डॉक्टरांची शाश्वती

प्रतिनिधी, सिंधुदुर्गा : लम्पी हा आजार फक्त गाई आणि बैलांना होतो. यामध्ये भरपूर ताप येऊन जनावरांच्या चट्टे दिसतात यातून गाठी फुटून जखमा होतात आणि या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत यामुळे जनावरांची काळजी घेणं महत्वाचं ठरतं.
महाराष्ट्र राज्यात लंपी सदृश्य आजाराने थैमान घातले असतानाच सोशल मीडियावर दूध व चिकन खाल्ल्यास लंपी सदृश्य आजार होऊ शकतो, अशा अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र दूध व चिकन खाल्ल्यास लंबी सदृश्य आजार होऊ शकत नाही. जिल्हावासीयांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन सिंधुदुर्ग पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉक्टर अरविंद दळवी यांनी केले आहे.