प्रतिनिधी, बुलडाणा : सही पोषण होगा, तो देश रोशन होगा , ब्रिद घेऊन पोषणमहा साजरा केला जात आहे..सुदृढ आरोग्यासाठी पोषन आहार हा महत्वाचा घटक आहे.ग्रामीण भागातील महिला पोषण आहर महत्व समजवुन सांगण्याच्या दृष्टीकोणातुन पाककृती व रानभाज्या प्रदर्शनीचे आयोजन बुलडाणा जिल्हयातील पाडळी येथे करण्यात आले आहे. महिला आणि बालकांचे पोषण व आरोग्य स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे.. या निमित्ताने महिला व बालविकास विभागाच्या वतीने बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण महिना अभियान राबविण्यात येत आहे..शरीरासाठी आवश्यक असलेल्या पोषण आहारा संदर्भात ग्रामीण भागातील महिलांना माहिती व्हावी या दृष्टिकोनातून पाडळी येथील अंगणवाडी बीट अंतर्गत पोषण आहार पाककृती व रानभाज्या प्रदर्शनचे आयोजन करण्यात आले होते.. यावेळी गरोदर ,स्तनदा महिलांना, किशोरवयीन मुलींना पोषण आहारा संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.प्रदर्शनीच्या माध्यमातून पालेभाज्या, कडधान्य ,रानभाज्या, मांसाहार यामध्ये असलेल्या पोषक घटकांची माहिती ग्रामीण भागातील महिलांना देण्यात आली.. यावेळी गावातील महिलांची आणि किशोर वयीन मुलींची मोठी उपस्थिती होती.केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पोषण महिना अभियानाचा फायदा ग्रामीण भागातील महिला आणि किशोरवयीन मुलींना होत आहे.
