प्रतिनिधी, उसमानाबाद : सन २०२० चा पिक विमा ३ आठवड्यात म्हणजे २७ सप्टेंबर पुर्वी देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विमा कंपनीला देऊन देखील विमा कंपनी पळवाट शोधण्याचा प्रयत्न करत आहे . मुदतीत रक्कम जमा न केल्यास पुन्हा सर्वोच्च न्यायालयात अवमान याचीकासह व्याज मागणी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती भाजपा आमदार तथा माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली .नविन वैद्यकिय महाविद्यालय मंजुरीच्या श्रयवादावर बोलताना विरोधकांवर टिका करत ज्यानी प्रामाणीक प्रयत्न केले त्यांचे श्रय असे म्हणत शासकिय रुग्णालय नविन इमारत बांधकामापासुन प्रयत्न होते व भविष्यात १००० बेडचे तसेच सर्व उच्च शिक्षीत स्वतंत्र डॉक्टर उपलब्ध असलेले महाविद्यालय बनवण्याचा मानस व्यक्त केला .मंत्रीमंडळ विस्तारावर मात्र बोलण्यास नकार दिला.
