जनतेज न्युज

संभाजी ब्रिगेडच्या वतीने किल्ले रायगडावर दुसऱ्या शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा

प्रतिनिधी, रायगड : संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज किल्ले रायगडावर दुसऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे 24 सप्टेंबर रोजी शानदार आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सोहोळ्याला संभाजी ब्रिगेडच्या केंद्रीय आणि विभागीय कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. या निमित्ताने सकाळी सव्वादहा वाजता राजसदरेवर जिजाऊ शिवराय प्रतिमेचे संभाजी ब्रिगेडतर्फे आयोजन पूजन, साडेदहा वाजता राज्याभिषेक समारंभ, १०.४५ वा . जिजाऊ वंदना अशा विविध कार्यक्रमाचे पार पडले. दुपारी १२ वा. मान्यवरांनी आपले ऐतिहासिक विचार मांडले. या सोहोळ्यात गिर्यारोहक समृध्दी भुतकर हिला हिरकणी पुरस्कार देऊन तसेच शाहीर, कवी गंगाधर साळवी, डॉ. वारिस अन्सारी, नरवीर अॅडव्हेंचर्सचे रामदास कळंबे, अजय पाटील, दिवंगत सर्जेराव झांजुर्णे, श्रीमंत सर्जे राव झांजुर्णे तसेच सौ. मोनाली निलेश झांजुर्णे यांना सन्मानित करण्यात आले.