जनतेज न्युज

गोंदियातील घटना दुर्दैवी राज्यात कायदा व सुव्यवस्था राहली नाही – नाना पटोले

प्रतिनिधी , अमरावती : गोंदीया जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रम शाळा मजितपुर येथील आदिवासी विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांसाठी एका वाहनात कोंबुन नेल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर राज्यभरातून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा यावर अमरावतीत प्रतिक्रिया दिली. आदिवासी मुलांना अशा प्रकारे जनावरासारखा अतिशय दुर्दैवी आहे.राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिला नाही. या संपूर्ण घटनेची चौकशी होऊन दोषीवर कारवाई झाली पाहिजे. राज्याला लुटण्याचा काम होत आहे, ते थांबलं पाहिजे.जनतेला न्याय व्यवस्थित आणलं पाहिजे अशी प्रतिक्रिया नाना पाटील यांनी दिली.