प्रतिनिधी , वर्धा : देवेंद्र फडणवीस यांच्या नखची बरोबर नाना पटोले करू शकत असा खोचक टोला आज भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी वर्ध्यातील स्थानिक विश्राम गृह येथे पत्रकारांशी संवाद साधताना केला. नाना पटोले यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी बघितले पाहिजे काय स्थिती आहे. शेतकऱ्यांचे बोनस कापले धानाचे बोनस देऊ केले ते दिले नाही देवेंद्र फडणवीस यांच्या डेव्हलपमेंट ची एक टक्का सुध्दा बरोबर नाना पटोले हे करू शकत नाही असा टोला त्यांनी लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांना वर्ध्याची तसेच महाराष्ट्रची इत्यंभूत माहिती आहे संपूर्ण अभ्यास केलेल्या कार्यकर्ता म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत असे यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
आपलं कुटुंब आपली जबाबदारी म्हणून आपण मुख्यमंत्री आणि आपला मुलगा उपमुख्यमंत्री हेच दिसले. आताही मुंबईत कोणत्याही बॅनर बघा चारच फोटो आहेत पाचवा फोटोच नाही आणि त्यामुळे उद्धव ठाकरे वर आता जे परिस्थिती झाली आहे 40आमदार सोडून गेलेत खासदार सोडून गेलेते हे कशामुळे होत आहे तर आपलं कुटुंब आपली जबाबदारी एवढच त्यांचा हेतू आहे म्हणूनच उद्धवजी सोबत आता कोणी कार्यकर्ता राहायला तयार नाही. एक दिवस त्यांच्या स्टेजवर तुम्हास चारच लोक दिसतील पाचवा दिसणार नाही ही वेळ एक दिवस नक्कीच येणार आहे. कार्यकर्त्यांना द्यायची वेळ आली तेव्हा मुलगा उभा झाला कार्यकर्त्यांला मुख्यमंत्री पद द्यायची वेळ आली तेव्हा स्वतःच मुख्यमंत्री झालेत. स्व. बाळासाहेब ठाकरेजी यांचे हे स्वप्न होते कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री करीन. स्व. बाळासाहेब ठाकरेंजी असताना नारायण राणे मुख्यमंत्री झाले पण उद्धव जी यांच्या हाती येताच ते स्वतःच मुख्यमंत्री झालेत यामुळे ही स्थिती झाली असे भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.
