प्रतिनिधी , नाशिक : धार्मिक तेढेमधून महिलेचा खून झाला असून लवकरच शक्ती कायदा केंद्र सरकारने मंजूर करावा अशी प्रतिक्रिया नीलम गोऱ्हे यांनी आज चांदवड येथे आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाल्या मुंबई येथे हिंदू पत्नीने बुरखा घातला नाही म्हणून मुस्लिम पतीने पत्नीची गळा चिरून हत्या केले आहे याबाबत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना विचारले असतात त्या म्हणाल्या की…. चिंता ते चिंताजनक बाबा असून कौटुंबिक हिंसाचार सर्व जाती धर्मात होत असून त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून महिलांना त्रास दिला जातोय. तरी या ठिकाणी धार्मिक तेढ मधून या महिलेचा खून करण्यात आला असून असे प्रकार घडू नये. याकरिता सरकारने विशेष मोहीम हाती घेतली पाहिजे .याकरता उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना यांच्या शक्ती कायदा हा संमत केला होता व तो केंद्र सरकारकडे देखील पाठवला आहे मात्र केंद्र सरकारकडून अजून शक्ती कायद्याला मंजुरी मिळाली नसून ती मंजुरी लवकर मिळाले तर नक्कीच गुन्हेगारांना शिक्षा होऊ शकते.
