जनतेज न्युज

नव्या काळातले युद्ध समाज माध्यमांवर लढले जाते – पंकजा मुंडे

प्रतिनिधी , बीड : बीडच्या परळी शहरात आयोजित करण्यात आलेल्या संत भगवान बाबा प्रतिष्ठान यांच्या सार्वजनिक दुर्गा महोत्सवाला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भेट दिलीय. या भेटीदरम्यान झालेल्या भाषणात पंकजा मुंडेंनी सोशल मीडियावर सुरू असणाऱ्या सोशल वॉर बद्दल आपले मत व्यक्त केलंय. जुन्या काळातले युद्ध वेगळे होते, आताच्या काळातले युद्ध वेगळे आहेत. आताचे युद्ध सोशल मीडियावर लढले जाते. त्यासाठी तलवारी भाले याची काहीच गरज नाही. मी तुझ्यावर अफवा पसरवते तू माझ्यावर अफवा पसरव असं म्हणत पंकजांनी सोशल वॉर बद्दल आपले मत मांडले आहे. नेमकं काय म्हणाल्यात पंकजा मुंडे पाहुयात.