जनतेज न्युज

सासरी जाते मी नांदाया… माझ्या मर्जीतला वसूलदार बोलवा…घोणे भारतीच्या दिशेनेत टेंभुर्णला आवतन खडकच…

प्रतिनिधी, पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालयात फक्त दोघांचे आदेश महत्त्वाचे मानले जातात. एक आहे पोलीस, आयुक्त दुसरे आहेत वसुदार. या खेरीज अतिरिक्त पोलीस,डीसीपी, ए सी पी, यांची किंमत शून्य झाली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तांनी मागील आठवड्यात पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे फर्मान जारी करून सात दूने चौदा जणांच्या बदल्या आलटी पलटी केले. ज्या पोलीस निरीक्षक चे पोट तड लागेपर्यंत भरले ते पोलीस आयुक्तालयात ढेकर देण्यासाठी आले . जे पोलीस निरीक्षक कर्तुत्वाने अडचणीत आले होते , ते देखील गुन्हा युनिटच्या छत्रछायेखाली आले.
एवढे असताना वसूलदार संघटना मागे नाही. त्यांनी देखील आपापल्या मेहेरबान मालकांसोबत जाण्या साठी आपले चंबू गबाळे बांधले आहे.
खडकच्या पोलीस निरीक्षक ची बदली भारतीला झाली तर भारतीच्या पोलिस निरीक्षक ची बदली खडक भूमध्य भागात झाली. बदलीनंतर वसूलदारांची चुळबुळ झाली. बदली होऊन आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसूलदारी देत असतील तर ठीक, नाहीतर पोलीस निरीक्षकच्या बदली पाठोपाठ ते स्वतः जाण्यास निघाले असल्याची खबर टाकोटाक आमच्या कार्याला समजली आहे.
थोडक्यात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीतील ५० वेश्या व्यवसाय केंद्र ….. १०/१५ मटका जुगार अडा ….. गुटका व इतर अमली पदार्थां ची वसुली सरंजाम पद्धतीने करणारे वसूलदार श्री. टेंभुर्ण हे खडक पोलीस स्टेशन मध्ये येण्यास निघाले आहेत. तर खडकच्या ३६० अंश डिग्रीमधील सर्व जुगार अड्डे….. पाणावलेल्या नाकासुंनी सोडून भारतीच्या दिशेने निघाले आहेत.
आता भारती व खडक या दोन पोलीस स्टेशन मध्ये वसूलदार पदांसाठी इच्छुकांनी मोर्चे बांधणे केली असून या दोघांना त्यांच्या त्यांच्या हद्दीत पोहचू न देण्याचा चंग बांधला आहे. ( क्रमशः)