जनतेज न्युज

अकोल्यात महात्मा गांधी जयंती निमित्त शहरातून निघाली रॅली

प्रतिनिधी, अकोला : अकोला शहरात आज महात्मा गांधी जयंती निमित्त शहरातल्या जठारपेठ मधील स्कूल ऑफ स्कॉलर या शाळेने एक थीम ठेवत शहरातून रॅली काढली आहे. या रॅली मधून पब्लिक अवरेनेस चा संदेश देण्यात आलेला आहे. जसे रोडवर बाईक चालवतांना हेल्मेटच्या नियमांचे पालन करावे असा संदेश देत पथनाट्य ही चौका चौकात करण्यात आलेल असून या रॅली मध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.