प्रतिनिधी, सातारा : सातारा जावलीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे नेहमीच आपल्या हटके अंदाजाने सतत चर्चेत असतात त्यांनी काल चक्क साताऱ्यातील एका दांडिया कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावून कार्यकर्यांच्या आग्रहाखातर ‘मै हु डॉन’ या गाण्यावर ठेका धरत डान्स केला तर दांडिया खेळण्याचा देखील आनंद लुटला सध्या ह्याच डान्स आणि दांडिया खेळण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
