जनतेज न्युज

वी मुंबईतील कोपरखैरणे येथे चार मजली इमारत कोसळली; जीवितहानी नाही

प्रतिनिधी, मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील बोनकोडे गावात एक चार मजली इमारत कोसळली. इमारत फार जुनी होती. इमारत कोसळण्या आधीच इमारत काहीशी हलत असल्याचे निदर्शनास आल्याने इमारतीमधील सर्व रहिवाशी्यांना इमारती बाहेर काढण्यात आले. इमारती मध्ये एकूण 40 कुटुंब राहत असल्याची माहिती समोर येत असून सर्व सुखरूप आहेत. या घटनेत इमारतीची एक बाजू पूर्णतः कोसळली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून कोणी नागरिक अडकली आहे का याची पाहणी करत आहेत.