जनतेज न्युज

सेवाग्राम आश्रम बापू कुटी येथे आल्यानंतर देशाच्या प्रती आपली प्रतिबद्धता दृढ होते – उपमुख्मंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी, वर्धा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिम्मित सेवाग्राम मध्ये बापू कुटीमध्ये येऊन आज त्यांना वंदन करताना मला अतिशय समाधान वाटत आहे. ही भूमी प्रेरणा भूमी आहे ऊर्जा भूमी आहे. या ठिकाणी आल्यानंतर देशाच्या प्रती आपली प्रतिबद्धता दृढ होते. आज राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता असा जो पंधरवडा आपण घेतला होता. त्या पंधरवड्याचा आज समारोप आहे.