प्रतिनिधी, जळगाव : तुम्ही वर्ष दोन वर्ष नाथाभाऊंची जेल मध्ये जाण्याची वाट पाहत आहे पण तुम्ही नाथाभाऊंची तुम्ही काळजी करू नका , मी बाहेरच राहणार आहे ,मी काही केलं नाही आहे आणि तुजा सारखा काही चोऱ्या केलं नाही , तुझा सारखं लबाड्या केलं नाही कोणाची जमिनी हडप केलं नाही तुमचे सुरेश दादाचे व्यवहार झाले आहे ते ही मला माहित आहे कुणा बरोबर साखर कारखान्याचे व्यवहार झाले ते ही मला माहित आहे. याचे सर्व तक्रारी ईडी कडे केल्या ते कसे दाबले हे ही मला पूर्व कल्पना आहे आहे नाथाभाऊंशी काय बोलणार तू. कल का छोकरा है तुझा वय जितकं नाही तितकं नाथाभाऊंचा राजकारणातलं वय आहे. असे आमदार खडसे यांनी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण बद्दल सांगितले.
