प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : सकाळी सात वाजेपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली असून मतदारांची मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर रांगा
13 ग्रामपंचाय बिनविरोध झाले असून उर्वरित 66 ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरु आहे.सध्या राज्यातील अनेक भागात उद्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. त्यात शहापूर तालुक्यात देखील 79 ग्रामपंचायती निवडणुकीसाठी पात्र आहेत. या ठिकाणी देखील आज मतदान प्रक्रिया सुरू झाली असून पहाटेपासून मतदारांनी मोठमोठ्या रांगा मतदान केंद्रावरती लावलेली दिसून येत आहे शहापूर तालुक्यात 79 ग्रामपंचायती पैकी 13 सरपंच पदाच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उर्वरित 66 जागांवर सरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी एकूण 255 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. त्याठिकाणी 1315 कर्मचारी तैनात केले असून ही मतदान प्रक्रिया संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
