जनतेज न्युज

खंडणीखोर माहिती अधिकार कार्यकर्ता रमेश खामकर याचा साथीदार प्रवीण शेंडे यांच्याकडून पुण्यातील पेठांमधील अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात कसुरी

पदनिर्देशित अधिकाऱ्यांकडे बोट दाखवून कार्यकारी अभियंता प्रवीण शेंडे स्वतःवरील जबाबदारी का झटकत आहेत

प्रतिनिधी, पुणे : विजय लोणके / पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्रमांक सातच्या हद्दीत पुण्यातील सर्व पेठा गावठाण यांचा समावेश होतो .आज पर्यंत जुन्या पुणे शहरांमध्ये अनाधिकृत बांधकामांचे मोठे पेव फुटले आहे . संबंधित अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे जबाबदारी पदनिर्देशित असलेले शाखा अभियंता व उप अभियंता यांची असले तरी कार्यकारी अभियंता म्हणून या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता प्रवीण शेंडे यांची आहे असे असताना देखील श्री प्रवीण शेंडे अनधिकृत बांधकामांवर कारवाई न करता त्यांना अभय देत आहेत. त्यामुळे प्रवीण शेंडे यांचे विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना पुणे महापालिका सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशीही मागणी होत आहे. तसेच पुणे महानगरपालिकेतील तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्ता खंडणीखोर रमेश खामकर यांच्या सल्ला व सूचनेनुसार श्री प्रवीण शेंडे काम करीत असल्याचे निदर्शनास आले असल्याने प्रवीण शेंडे यांचे विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे .

सदर होऊन पुण्यातील महत्त्वाच्या पेठांमध्ये मोठ्या संख्येने अनाधिकृत बांधकाम झाली आहेत . पुण्यातील संपूर्ण लक्ष्मी रोडवर आज पावेतो अनेक मोठी अनधिकृत बांधकामा झाली आहेत. सदाशिव पेठ नारायण पेठ सोमवार पेठ मंगळवार पेठ बुधवार पेठेत तर हैदोस घालून ठेवला आहे शुक्रवार पेठ तसेच इतर विभागांमध्ये कसबापेठेसारखे ठिकाणी देखील अनधिकृत बांधकाम मोठ्या संख्येने झाले आहेत . अशा परिस्थितीत या अवैद्य व बेकायदेशीर बांधकामांवर कठोर कारवाई करणे ऐवजी संबंधित बांधकाम व्यवसायिकांशी आर्थिक हातमिळवली करण्याचे काम श्री प्रवीण शेंडे हे करत आहेत . यामध्ये खंडणीखोर माहिती अधिकार कार्यकर्ता श्री प्रवीण शेंडे यांना ब्रीफिंग करण्याचे , बिल्डर बांधकाम व्यवसायिकांना प्रवीण शेंडे यांचे कडे घेऊन जाण्याचे काम मध्यस्थ म्हणून करीत असल्याचे देखील निदर्शनास आले आहे . त्यामुळे संबंधित प्रवीण शेंडे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे .

तसेच शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे खंडणीखोर माहिती अधिकार कार्यकर्ता रमेश खामकर याचे विरुद्ध खंडणी व अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाच्या व्यक्तीकडून दर महिना दोन हजार रुपयाची खंडणी न मिळाल्यामुळे त्यांचे वर जातीवाचक शिवीगाळ करून त्यांना अपमानित केल्याप्रकरणी रमेश खामकर यांचे विरुद्ध अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. तसेच याची सहाय्य पोलीस आयुक्त विश्रामबाग यांच्याकडून चौकशी सुरू आहे सबब वरील सर्व बाबी लक्षात घेता प्रवीण शेंडे.
त्यामुळे तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्ता खंडणीखोर रमेश खामकर यांच्या दलाली व मध्यस्थीला कुठेतरी महापालिकेमध्ये प्रतिबंध बसावा तसेच याला महापालिकेत येण्यापासून महापालिका आयुक्तांनी प्रतिबंध करण्यात यावा . श्री रमेश खामकर हे पुणे महानगरपालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी असताना देखील पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना मध्यस्थ म्हणून दलाली करण्याचं काम करीत आहेत . तरी अशा को प्रवृत्तीच्या जातीवादी इसमाला पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दूर ठेवावे अशीही मागणी संविधान परिषदेच्या वतीने आम्ही करीत आहोतच . तसेच पुण्यातील अनाधिकृत बांधकामावर येत्या सात दिवसात कारवाई न केल्यास पुणे महानगरपालिकेच्या बाहेर बेमुदत तीव्र स्वरूपाचं धरणे आंदोलन करण्यात येईल अशी घोषणा संविधान परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.