जनतेज न्युज

स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील सुरू असलेल्या अवैद्य धंद्यामध्ये स्वारगेट पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांच्या सहभाग ?

दिवाळीमध्ये ही सुरु आहे जुगार अड्डे यांची आतिषबाजी

प्रतिनिधी, पुणे : विजय लोणके / स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत आज दिनांक 26 ऑक्टोबर 2022 रोजी पर्यंत कायद्याद्वारा प्रतिबंधित असलेले बेकायदेशीर जुगार अड्डे आजही सुरू असल्याचे दिसून आले आहे . सदर दिवाळीच्या निमित्ताने मटका अड्डा मुंबई कल्याण ओपन क्लोज मटका सध्या बंद असल्याने सदरील मटका अड्ड्याच्या ठिकाणी आजही बेकायदेशीरपणे क्लब ,अंदर बाहर, सोरट ,पणती पाकोळी यासारखे अवैद्य व बेकायदेशीर धंदे सुरू असल्याचे दिसून आले आहे . सामाजिक सुरक्षा विभागाने अनेकदा कारवाई करून देखील सदरील धंदे बंद झाले नाही. स्वारगेट पोलिस स्टेशन मधील काही पोलिस कर्मचाऱ्यांचा धंद्यामध्ये सहभाग असल्या कारणामुळेच इसम नामे भाऊ साबीर शेख कारवाई होत नसल्याने चे आली आहे त्यामुळे सदरील इसमावर प्रचलित कायद्यानुसार मुका व तडीपारीची कारवाई करण्याची मागणी होत आहे.

स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत शाहू उर्फ शाबीर शेख नावाचे इसमाने स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत सुमारे 22 ठिकाणी मटका जुगार अड्डे सुरू ठेवले आहेत . वरिष्ठ पोलीस निरीक्षक सामाजिक सुरक्षा विभाग यांनी आज पावतो दोन ते तीन वेळेस स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई करण्यात आली होती . असे असताना देखील स्वारगेट पोलीस स्टेशन मधील काही कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांचा हिस्सा किंवा टक्केवारी सदरील शाहू उर्फ साबीर शेख या इसमाच्या धंद्यामध्ये असल्याचे सांगितले जात असल्याने त्यांचे वर स्वारगेट पोलीस स्टेशन यांच्याकडून कारवाई केली जात नाही. आज दिनांक 26 ऑक्टोंबर 2022 रोजी पर्यंत आमच्याकडे मागील तीन महिन्यातील मटका अड्ड्या वरील मटक्याचा चिट्ट्या आहेत . स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील इसमनामे साबीर शेख उर्फ
स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत इसम नामे शाहू उर्फ साबिर शेख याचे एकूण 22 मटका जुगार अड्डे सुरू आहेत. संबंधित काही ठिकाणी आम्ही मागील तीन महिन्यांपासून एक आमच्याकडे प्रतिनिधी बनावट ग्राहक बनवून पाठवून त्याची खात्री केली असता सदरील 22 ठिकाणी मटका व जुगार अड्डे सुरू असल्याचे दिसून आले आहे . सबब सदरील मटका अड्ड्यावरील मटक्याच्या सर्व चीट्ट्या आज रोजी आमच्याकडे आहेत. पोलिसांनी मागितल्यास किंवा मे. न्यायालयाने मागितल्यास त्या सर्वचिट्ट्या व पुरावे मेहरबान न्यायालय व पोलिसांना देण्यास आम्ही तयार आहोत .

सदर आज दिनांक 26 ऑक्टोबर 2022 रोजी पर्यंत सदरील ठिकाणी मटका अड्डा बंद असला तरीही जुगाराचे क्लब पणती पाकोळी रमी क्लब सुरू असल्याचे दिसून आले आहेत. दरम्यान स्वारगेट पोलीस स्टेशन मधील काही पोलीस कर्मचाऱ्यांचा या अवैध धंद्यामध्ये आर्थिक गुंतवणूक व हिस्सा असल्याकारणामुळेच त्यांच्यावर कारवाई केली जात नाही . माननीय सामाजिक सुरक्षा विभाग माननीय गुन्हे शाखा युनिट व इतर गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून देखील आज मी 30 वरील धंदे बंद होत नाहीत याबाबत वरिष्ठ स्तरावरून चौकशी होऊन यामध्ये दोषी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी . तसेच शाहू उर्फ साबिर शेख याच्याविरुद्ध मोका व तडीपारची कारवाई करण्यात यावी अशी मागणी याद्वारे करण्यात येत आहे. सदरील अवैध धंद्यामध्ये अन्य कोणत्या गुन्हेगारांचा सहभाग आहे किंवा कसे हे देखील पोलिसांनी योग्य अशी तपासणी व चौकशी अन्वेषण करून खऱ्या गुन्हेगाराला कठोर कारवाई करून कायद्याची परिणाम कारक अंमलबजावणी करावी अशी मागणी होत आहे.