जनतेज न्युज

अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नसल्यामुळे सावकारी कर्ज काढून रब्बी हंगामातील पेरणीला सुरूवात

प्रतिनिधी, नांदेड : नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांना पीक विमा,अतिवृष्टीचे अनुदान प्राप्त होवूनही ऐन दिवाळीच्या तोंडावरही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.अतिवृष्टी व परतीच्या पावसाने हाता तोंडाशी आलेली पिके पाण्यात गेली असून.ऐन दिवाळीच्या तोंडावर पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या दिवाळी सणावर संक्रात कोसळली. खरीप हंगामात काहीच शिल्लक राहिले नसल्याने नांदेड जिल्ह्यातील देगाव ता.नायगाव येथील प्रल्हाद विठ्ठलराव एनगंटे या शेतकऱ्यांनी सावकारी कर्ज काढून रब्बी हंगामातील हरभरा ज्वारी पेरणीला टँकरद्वारे सुरूवात केली आहे. पिक विमा,अतिवृष्टीचे अनुदान सरकारने लवकरात लवकर देण्यात यावे अशी प्रतिक्रिया दिली आहे.