प्रतिनिधी, यवतमाळ : राजकारणात आरोप होणे हा नित्याचाच खेळ आहे. शिंदे- फडणवीस सरकारमध्ये काही वाद निर्माण झाले असल्यास ते निपटवले जातील. विरोधकांनी उगाच ध चा मा करू नये. हे सरकार शेतकरी, महिलांच्या हिताचे काम करीत आहे. त्याची पावती मतदार आम्हाला येत्या काळात देतील. विरोधकांनी उगाच तेल ओतण्याचे काम करू नये, अशा शब्दांत खासदार भावना गवळी यांनी विरोधकांना खडसावले.
