जनतेज न्युज

टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला हलवल्याने महाराष्ट्र सरकार विरोधात भीक मांगो आंदोलन

प्रतिनिधी, सोलापूर : टाटा एअरबस प्रकल्प गुजरात ला हलवल्याने राज्य सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून उद्योग व व्यापार सेलच्या वतीने सोलापुरात भीक मागो आंदोलन करण्यात आले. राजवाडे चौक येथील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयापासून या भीक मागो आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या नवी पेठ येथे दुकानात जाऊन भिक मागून पैसे गोळा करण्यात आले.

वेदांता सारखा प्रकल्प भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे गुजरातला गेला असताना आता टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील युवकांवर भीक मागायची वेळ शिंदे व फडणवीस सरकारमुळे आली असल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले.