प्रतिनिधी, सोलापूर : करमाळयातील कमलाभवानी कारखान्याच्या सातव्या गाळप हंगामाला शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोळी टाकून सुरुवात झाली असून रोज सुमारे १० हजार टन ऊस तोड होईल, अशी यंत्रणा उभा केली असल्याचे चेअरमन विक्रमसिंह शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.
कारखान्याचे डायरेक्टर जनरल एच.बी. डांगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. हा कारखाना लवकरच प्रगती पथावर जाऊन आपण या वर्षी आपल्याच कारखान्याची सर्व रेकॉर्ड मोडणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी ३६० ट्रॅक्टर व २२५ ट्रॅक्टर गाडी अशी यंत्रणा भरलेल्या असून कोणत्याही प्रकारचे अडचण येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. रोज सुमारे 10 टन ऊस तोड होईल एवढी यंत्रणा उभी केली असल्याची माहिती चेअरमन विक्रमसिंह शिंदे यावेळी दिली.
