प्रतिनिधी, नाशिक : टाटा कडे कोणी ही टक्केवारी मागणं शक्यच नाही.महाराष्ट्रातील एक एक प्रकल्प हे गुजरातला व बाहेर चालले असून टाटाचं काम एकदम चोक असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. निफाड तालुक्यातील स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था, पिंपळगाव बसवंत संचलित कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना लिमिटेड रानवड यांच्या 40 वा गळीत हंगामा प्रसंगी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना भुजबळ बोलत होते.
