जनतेज न्युज

जांब समर्थ मोर्ती चोरी प्रकरणात आतापर्यंत 5 पैकी 4 आरोपी अटकेत

प्रतिनिधी, जालना : जालना जिल्ह्यातील जांब समर्थ गावातील राम मंदिरातील मुर्ती चोरी प्रकरणात आणखी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून 5पैकी एक जण अद्याप पकडणे बाकी आहे. कही मुरत्याही मिळाल्या आहेत. प्रदिर्घ काळानंतर मूर्ती चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या जालना पथकास मोठं यश आले आहे.
घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ गावातील रामदास स्वामी यांच्या पूर्वजांनी पंच धातूच्या अतिप्राचीन अशा प्रभू श्रीरामचंद्राच्या आणि हनुमान, सीता, भरत शत्रुघ्न, आदींच्या १३ मूर्ती गेल्या दोन महिन्यांपूर्वी पासून चोरी गेल्या होत्या. या प्राचीन मूर्तीचा कुठल्याच प्रकारे ठाव ठिकाणा लागत नसल्याने भविकांकडून या मूर्ती चोरी प्रकरणाचा छडा लागावा म्हणून आंदोलन देखील करण्यात आले होते.
काल दोन आरोपींना पकडून त्यांच्या कडून पंचायतन मूर्ती जप्त केली असून त्याची माहिती काल जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे यांनी दिली होती. त्याच वेळी आम्ही मुख्य आरोपीच्या मागावर असून त्याला पकडून आणण्याचा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला होता. त्यामुळे या तपासला वेग आला असून त्याच्या ताब्यातून काही मुर्त्या जप्त केल्याचे सांगितले आहे.