प्रतिनिधी, पुणे : विजय लोणके / पुणे महापालिकेत सध्या जो अधिकारी कर्मचारी जास्त पैशांची बोली लावणार त्याला सगळ्यात मोठे पद मिळणार हे हमखास झाले आहे. पैसे देवून, जिथं बदली पाहिजे, तिथे बदली मिळते. इंजिनिअर असेल तर बांधकाम खात्यात वर्षानुवर्षे रहा, तुम्हाला कुणीच काही बोलणार नाही… पगाराला बदलीच्या खात्यात तर कामाला तहहयात बांधकाम विभागात असेच चित्र अनेक वर्षांपासून दिसत आहे. अगदी अतांत्रिक पदांचेही तसेच आहे, तुम्हाला टॅक्स पाहिजे… मग एवढी रक्कम दया, तुम्हाला तहहयात टॅक्स विभागातच ठेवू, तुम्हाला साप्रवि पाहिजे, विधी पाहिजे, बोला बोला, कोणते खाते पाहिजे, सर्वांचा दर ठरलेला आहे. पैसे द्या, पद घ्या, पैसे दया पोस्टिंग मिळवा, पैसे द्या, प्रभारी व अतिरिक्त पदभार मिळवा.. असेच काहीस धोरण सध्या पुणे महापालिकेत सुरू आहे. त्यामुळे जिकडे तिकडे पैशांचा महापुर आला आहे. थोडक्यात लाखोंची बोली आणि कोट्यवधी रुपयांचे व्यवहार दरराजे पुणे महापालिकेत होत आहेत.
सध्या खाजगी सुरक्षा रक्षकांचा प्रश्न गहन स्वरूपाचा झाला आहे. याबाबत आम्ही उपआयुक्त माधव जगताप, नितीन केंजळे यांच्यासहित अतिरिक्त आयुक्त श्री. रविंद्र बिनवडे व श्री. कुणाल खेमणार यांच्याकडे याबाबत माहिती घेतली असता, नवीन ठेकेदार आला की खाजगी सुरक्षा रक्षकांचे पगार देणार असे सांगितले होते. दिवाळी आली आणि गेली तरी कित्येक कर्मचाऱ्यांच्या खात्यात 10 हजार रुपडे देखील पडले नाहीत. माध्यमांना मात्र मोठ्या राणाभिमादेवी थाटात माहिती दिली जाते परंतु प्रत्यक्षात मात्र खाजगी सुरक्षा रक्षकांच्या हातात मात्र सुक्या नारळाची करवंटीच आहे.
खाजगी सुरक्षा रक्षकांमध्ये प्रभारी पदावर कार्यरत असलेले सुरक्षा अधिकारी श्री. राकेश विटकर यांच्याकडे काही माहिती विचारल्यास, ते थेट नितीन केंजळे आणि माधव जगताप यांच्याकडे बोट दाखवितात. परंतु साप्रवि कडून अधिक माहिती घेतली असता, श्री. राकेश विटकर हे पुणे महापालिकेतील अतांत्रिक पदावरील कर्मचारी असून, उपअधीक्षक पदापर्यंत आलेले कर्मचारी आहेत.
श्री. राकेश विटकर हे पुणे महापालिकेत येण्यापूर्वी पोलीस खात्यात किंवा लष्करात कुठेही कामाला नव्हते. तरी देखील त्यांना पुणे महापालिकेचे सुरक्षा अधिकारी पदावर बसविण्यात आले आहे. राकेश विटकर यांना ना छाती आहे, ना… उंची आहे… तसेच चष्म्याशिवाय दिसत नाही. असे असतांना देखील श्री. विटकर यांना या पदावर बसविण्यात आले आहे.
ठेकेदारांकडून नोटा मोजणे आणि थेट माधव जगतापांपर्यंत पोहोचविण्याचे काम श्री. विटकर हे करीत असल्याने, चाकरीचा गडी म्हणून श्री. विटकर यांना माधव जगतापांनी सालकरी गडी म्हणून ठेवले आहे की काय अशी आजही पुणे महापालिकेत चर्चा आहे. त्यामुळे माधव जगताप यांच्याकडे देखील पात्रता नसतांना देखील अनेक विभागांचा अतिरिक्त व प्रभारी पदभार आहे, नितीन केंजळे ह्या कामगार कल्याण अधिकारी पदावरील इसमाला देखील कामागार कायदयातील काहीच समजत नाहीये तरी देखील शिपाई ते कामगार कल्याण अधिकारी पदाचा चढता आलेख डोळ्यात भरण्यासारखा आहे. त्यामुळे राकेश विटकर, माधव जगताप, नितीन केंजळे यांच्यापासून ज्यांना ज्यांना अतिरिक्त व प्रभारी पदांचा पदभार देण्यात आलेला आहे, त्यांच्या कामांचे ऑडीट व अहवाल पाहुन त्यांच्याकडील पदभार काढुन घेण्यात यावा. प्रथम राकेश विटकर नावाच्या जोकरवर प्रथम कारवाई करून त्यांला पुनः मुळ पदावर रिव्हर्ट करण्याची मागणी होत आहे.
