प्रतिनिधी , अमरावती : भाजप आणि आरएसएस च्या दडपशाही विरोधात आज ३१ ऑक्टोंबर रोजी भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक( इर्विन)इ ते जिल्हाधिकारी कार्यालवर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळीआरएसएस व भाजपा विरोधात घोषणा बाजी करून निषेध करण्यात आला. तत्पूर्वी मोर्चा जिल्हाकचेरीवर आल्यानंतर त्याच जागी निषेध सभा घेण्यात आली. त्यांनतर त्याच ठिकाणी मोर्चाचे समापन करण्यात आले.सद्या आरएसएस प्रणित भाजप शासन करीत आहे. त्यामुळे देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आल्याचे भारत मुक्ती मोर्चाचे म्हणणे आहे. या विरोधात संपूर्ण देशात आंदोलन करण्यात आले आहे. आज इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत भारत मुक्ती मोर्चा च्या वतीने आंदोलन करण्यात आले. भाजपकडून ईव्हीएम मशीनचा दुरुपयोग करण्यात येत. तसेच ओबीसींची जात निहाय जनगणना करण्यात आली नसल्याचे भारत मुक्ती मोर्चाचे म्हणणे आहे. त्याशिवाय उद्योग खाजगीकरण, बेरोजगारी , महागाई आदी प्रश्नांवर भाजप सरकार अपयशी ठरली असल्याचा आरोप भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने करण्यात आला असून या विरोधात विविध देशात मध्ये मोर्चा काढण्यात आले आहे.
