जनतेज न्युज

राज्यातील प्रकल्प जाण्याला कोण जबाबदार आहे हे मी आता सविस्तरपणे बोलणार नाही.. मला कोणतेही राजकारण करायचे नाही – मुख्यमंत्री

प्रतिनिधी , सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी महाबळेश्वर, पाचगणीसह सातारा जिल्ह्यातील ‘क’ वर्ग पर्यटन तसेच धार्मिक आणि यात्रा स्थळांच्या विकास कामांचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी ग्रामदैवत उतेश्वर देवाचे दर्शन घेत राज्य प्रगतीपथावर जाऊदे असं साकडं देखील घातलं..

या दरम्यान बोलताना त्यांनी राज्यात प्रकल्प येण्यासाठी मी आणि फडणवीस प्रयत्न करत असून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आमचा सातत्याने संपर्क असून केंद्रीय मंत्र्यांशी देखील राज्याच्या विकासाच्या बाबत आम्ही संपर्कात आहोत.. पुढील काळामध्ये लवकरच आम्ही नवीन मोठमोठे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आणू.. राज्यातून जे प्रकल्प गेले असा आरोप सुरू असून याला जबाबदार कोण आहे हे मी आता सविस्तरपणे बोलणार नाही ते उपमुख्यमंत्री यांनी विस्तृतपणे मांडले असून याबाबत मला कोणतेही राजकारण करायचं नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे..