प्रतिनिधी , ठाणे : राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करीत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, एका राज्याचे नाहीत. त्यांनी सर्व राज्यांना समान न्याय द्यावा, अशी भूमिका मांडली. यावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत ते भूमिका मांडू शकतात. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भुमिकेचा आम्ही विचार करु. पालकमंत्री उदय सामंत आज रायगड जिल्ह्याच्या दौर्याणवर आले होते. अलिबागमध्ये जनता दरबारात ते जनतेचे प्रश्न सोडवीत आहेत. जनतेचे प्रश्न व समस्यांना जलद न्याय देण्यासाठी जनता दरबार भरविला असल्याचे सामंत यावेळी म्हणाले. यावेळी अलिबागेत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सामंत यांनी भूमिका मांडली.
