प्रतिनिधी , जळगाव : चोपडा तालुक्यातील धानोरा येथे 16 कोटी ची पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार लता सोनवणे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे धानोऱ्याचे सरपंच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी माध्यमांचे प्रतिनिधींनी संवाद केले असता यावेळी त्यांनी सांगितले.
* मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात त एक नोव्हेंबर रोजी ठाकरे गटाचे उपनेते सुषमा अंधारे यांची सभा होत आहे याबद्दल गुलाबराव पाटील यांनी सांगितले तीन महिन्यानंतर आलेल बाळ आहे या पक्षामध्ये येऊन त्यांच्या तीन महिन्याच्या कार्यकाळ झाला आहे त्यांच्या आदित्य साहेब उद्धव साहेब यांच्या बद्दल काय बोलले आहे त्या क्लिपा ऐकवल्या हिंदू देवतांवर किती भयानक टिका या बाईने केलेले आहे आमच्यावर त्यांनी टीका करावे त्यांच्या पक्षाने दिलेला तो त्यांना अधिकार आहे हिंदू देवतांवर तसेच हिंदू धर्मावर काय बोललेले आहे यांचे क्लिपा दाखवाव्यात अन्यथा आम्ही हे सहन करणार नाही.
* महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष संदर्भात उद्या निकाल जाहीर होणार आहे या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितले कोर्टाच्या निकाला बाबतीत मला बोलता येणार नाही जे काही होईल ते सगळ्यांना मान्य करावे लागेल.
* विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या सुरक्षा कमी करण्यात आल्या आहे आणि बंडखोर आमदारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आले या संदर्भात विचारणा केले असता त्यांनी सांगितले आम्ही बंडखोर नाही आम्ही उठाव केलेला आहे आम्हाला कमिटीने सुरक्षा दिलेली आहे सुरक्षा देण्यासंदर्भात कमिटी असते कमिटी ज्याप्रमाणे सूचना करीत असतात त्याप्रमाणे गृहखात सुरक्षा देत असतं काही लोकांचे सुरक्षा कमी अधिक झाले असतील हा कमिटीचा अहवाल आहे.
* मंत्रिमंडळाचे विस्तार होणार आहे यावेळी चिमणराव पाटलांनाही मंत्री पद मिळेल किशोर पाटलांनी अपेक्षा व्यक्त केली असल्याचे विचार केली आहे त्यांनी सांगितले मी एकनाथ शिंदे नाही ना त्यामुळे मी बोलू शकत नाही .
* बच्चू कडू आणि रवी राणा यांनी नेत्यांच्या बैठकीत समजून घेतलं ऐकून त्यांनी जो निर्णय घेतला त्यांचे आभार मानतो लोकांच्या संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
* राज्यातील प्रकल्प दुसऱ्या राज्यात जात असल्याचे विचारणा केली असते याबद्दल त्यांनी सांगितले उदय सामंत मंत्री महोदय जे आहेत प्रत्येक गोष्टीची अपडेट देतात आणि येत्या काही दिवसांमध्ये मोठे प्रकल्प कसे येतील या पद्धतीची घोषणा मुख्यमंत्री कुठे कुठे प्रकल्प येणार आहे याची घोषणा करणार असल्याने त्यांच्या तो अधिकार आहे.
