जनतेज न्युज

शेतकऱ्यांचा वापर फक्त राजकारणासाठी होत आहे – राजु शेट्टी

प्रतिनिधी, अहमदनगर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजु शेट्टी यांनी पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथे उस परिषद घेत उस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत जनजागृती केली आहे.राज्य सरकारला उस उत्पादकांच्या मागण्या मान्यच कराव्या लागतील. गेल्या वर्षी उध्दव ठाकरे यांच्या सरकारमध्ये अतिवृष्टी झाली त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मागणी केली की,शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये द्या. या वर्षी पुन्हा अतिवृष्टी झाली. पण विरोधी पक्षात उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आता उध्दव ठाकरे यांनी मागणी केली की शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये द्या तर त्यांनी फक्त १३ हजार ५०० रुपये. किमान तुम्ही विरोधी पक्षात असताना मागत आहात ते सत्तेत आल्यावर तरी द्या. याचा अर्थ शेतकऱ्यांचा वापर फक्त राजकारणासाठी करायचा. असे यावेळी राजु शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकुन टीका केली.