जनतेज न्युज

लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार यांचा पदभार काढला;उपशिक्षणाधिकाऱ्याकडे तात्पुरता पदभार

प्रतिनिधी, सोलापूर : सोलापूर-जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार यांवर अँटी करप्शन विभाग सोलापूर युनिटने 25 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात कारवाई केली आहे.यामुळे शिक्षण खात्याला काळिमा फासली आहे.त्यांवर कारवाईसाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की,किरण लोहार यांच्यावर कारवाई साठी ,शिक्षण उपसंचालक यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली.25 हजार रुपये लाच घेताना किरण लोहार अडकले होते. उत्तर सोलापूर तालुक्यातील एका खाजगी शाळेला 10 पर्यंत मान्यता देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच प्राथमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी मागितली होती.तडजोडी अंती 25 हजार रुपये ठरले होते.31 ऑक्टोबर रोजी सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास 25 हजार रुपये घेताना शिक्षण अधिकारी रंगेहात एसीबीच्या जाळ्यात अडकले.मंगळवारी दुपारी किरण लोहार यांना कोर्टात हजर केले असता 3 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.तात्पुरता पदभार उपशिक्षणाधिकाऱ्यांकडेसोलापूर जिल्ह्याचे वादग्रस्त प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांवर कारवाई झाल्याने शिक्षण खात्यात एकच खळबळ उडाली आहे.मुख्य अधिकारीच गेल्याने शिक्षण खात्याची जबाबदारी उप शिक्षणाधिकारी संजय जावीर यांकडे दिला असल्याची माहिती जिल्हा परिषद सीईओ दिलीप स्वामी यांनी दिली आहे.