प्रतिनिधी, नागपूर : नागपुर महानगर पालिकेत मागील काही वर्षा पासून कंत्राटी संगणक चालक कार्यरत आहे. त्याना सध्या स्थितीत रू. 20666/- वेतन देण्यात येत असून त्यांचे PF व ESIC कपात करण्यात येत आहे प्रशासनात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असताना ते प्रामाणीकपणे दिलेली कामे करीत आहेत. एवढेच नव्हे तर कोरोणाचा प्रादुर्भाव असताना सर्वत्र कामकाज बंद होते व इतर महापालिका कर्मचान्यांना सुट्टी दिली होती त्यावेळी या कर्मचान्यांनी आपली सेवा दिली. असे असताना स्थायी समिती सभेत ठराव नुसार नवीन कंत्राटदार ठेवण्याच्या हेतूने निविदा मागविण्याचा प्रयत्न होत आहे. नवीन कंत्राटी संगणक ऑपरेटरचे मानधन कमी करण्यात येणार आहे. किमान वेतन कायदयाचे महापालिका प्रशासन उल्लंघन करीत आहे. स्थायी समितीचा ठराव रद्द करावा. कंत्राटी कामगारांना नियमित सेवेत समाविष्ट करावे, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले आहे.
