प्रतिनिधी, यवतमाळ : सगळीकडे दिवसेंदिवस अपघात वाढत चालले आहे. त्यामुळे नागरिक मृत्यमुखी पडत आहे तर, अनेकांना कायमचे अपंगत्व येत आहे. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून अपघात टाळण्यासाठी यवतमाळ येथील वाहतूक शाखेने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
सगळीकडे रस्ते चकाचक झाले आहे. त्यातच वाहनांचा वेग कमालीचा वाढला आहे. त्यामुळे रस्ते अपघात वाढले आहे. वाहन चालवताना नियम पाळले पाहिजे, असे आवाहन वारंवार करण्यात येते. तरीदेखील नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात. वाहन चालवताना सीटबेल्ट लावला जात नाही. खासगी वाहनात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले जातात. दुचाकीवर ट्रिपल सीट बसून प्रवास केला जातो. सुसाट वेगात वाहन पळविले जाते. अशा वाहन चालकांविरुद्ध वाहतूक पोलीस कारवाई करून नियम पाळण्याचे आवाहन नागरिकांना करीत आहेत. दंडात्मक कारवाई झालेले नागरिक इतरांनी आता नियमांचे पालन करावे, असे सांगत आहे.
