प्रतिनिधी , नाशिक : द्राक्ष उत्पादकांची दरवर्षी देशांतर्गत व देशाबाहेरील द्राक्षमाल व्यवहारात व्यापाऱ्यांकडून लाखो रुपयांची फसवणूक होते ही फसवणूक कशी टाळता येईल यासाठी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी निफाड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वार्षिक तपासणीसाठी आलेल्या नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील व नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांची भेट घेऊन किफायत मांडली यावेळी निफाड तालुक्यातील पोलीस प्रशासन, द्राक्ष बागायतदार संघाचे पदाधिकारी तसेच लासलगाव व पिंपळगाव बाजार समितीचे सचिव यांची बैठक घेतली यात व्यापारी वर्गाची माहिती, पायलट, सर्व्हिस प्रोव्हायडर यांची माहिती नोंदविण्याची मागणी केली तसेच द्राक्ष बागायतदारांचे द्राक्षमाल व्यवहार हे कायद्याच्या चौकटीत येण्यासाठी सौदा पावतीचा मसुदा देखील मांडण्यात आला याबाबत जानेवारी महिन्यातच द्राक्ष बागायतदारांचा प्रबोधन महामेळावा घेऊन त्याबाबत जागृती केली जाईल असे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांनी स्पष्ट केले.
