प्रतिनिधी , जळगाव : 25 डिसेंबर या दिवशी सर्वत्र ख्रिसमस साजरा केला जातो या दिवशी प्रभू येशू यांच्या जन्म दिवस असल्याने ख्रिश्चन बांधव मोठ्या उत्साहात व आनंदात ख्रिसमस साजरा करीत असतात आज चोपडा शहरातील टपरी शॉप लहान-मोठे दुकान या ठिकाणी महिला व लहान बालक जाऊन ख्रिसमस व येणाऱ्या नव वर्षाचे शुभेच्छा गीत द्वारे व शुभेच्छा कार्ड देऊन दिल्यात यावेळी लहान बालक सांताक्लॉज बनलेले होते चोपडा शहरातील दुकानदार व नागरिकांना ख्रिसमस निमित्त शुभेच्छा देताना महिला बालक उपस्थित होते यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसत होता.
