प्रतिनिधी , जळगाव : चोपडा पोलीस उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रावले यांना गोपनीय माहिती मिळाली की मध्यप्रदेश मधून महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखाचे तस्करी होत असल्याची त्यावरनं पोलीस उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रावले यांनी पथकासह सापळा रचला असता सदर वाहन आपल्या हद्दीत आला असता आणि पास व्हायला लागला असता त्याचा पाठलाग करून त्या आयसर गाडीला पकडल्याने त्यामध्ये महाराष्ट्र मध्ये बंद असलेला गुटखा 23 लाख चोपन्न हजाराचा तो मिळून आला गाडीसह एक जणाला ताब्यात घेण्यात आलेल्या आहे तरी एक जण फरार झालेला आहे धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आठ लाखाची गाडी व 23 लाख 54 हजाराच्या गुटखा असा 31 लाख 54 हजाराच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे व एका जणाला अटक करण्यात आलेली आहे फरार असलेला आरोपीच्या शोध घेणे सुरू आहे महाराष्ट्रात बंद असलेला गुटखा मध्यप्रदेश मधून वाहतूक केली जाते याआधीही चोपडा उपविभागात असे मोठ्या कारवाया करण्यात आलेले आहेत गुटखाचे तस्करी करणाऱ्यांवर बंदी घालायची आहे अशा मोठ्या कारवाई करून गुटखा तस्कर करणाऱ्यांच्या व्यवसाय बंद पाडायचे आहे असे अवैधरित्या गुटख्याचे तस्करी करणाऱ्या बद्दल चोपडा व धरणगाव येथील नागरिकांनी जर गोपनीय माहिती द्यायची असेल त्यांनी बिनधास्त स्थानिक पोलीस अधिकारी किंवा स्वतः माझ्याशी संपर्क साधून माहिती देऊ शकता त जेणेकरून जास्तीत जास्त कारवाई आपल्याला करता येईल असे आव्हान चोपडा पोलीस उपविभागीय अधिकारी ऋषिकेश रावले यांनी केले.
