प्रतिनिधी , जळगाव : चोपडा येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला या ग्राहक दिनाला तहसीलदार अनिल गावीत ज्येष्ठ पत्रकार अनिल पालीवाल ग्राहक संघटनेचे पदाधिकारी कैलास महाजन विकास जोशी राजेश खैरनार यांच्यासह ग्राहक उपस्थित होते. यावेळी ग्राहकांचा हक्क आणि ग्राहकांच्या फसवणूक यावरती तहसीलदार अनिल गावित यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं आणि यापुढे ग्राहक दिवस ग्रामीण भागात अथवा महाविद्यालयात घेतला जाईल असे सांगितले या ग्राहक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त जेष्ठ पत्रकार अनिल पालीवाल विकास जोशी कैलास महाजन यांनी मार्गदर्शन केलं त्याचबरोबर अनिल पालीवाल यांनी काही खंत देखील व्यक्त केल्यात. कार्यक्रमात पुरवठा अधिकारी देवेंद्र नेतकर पुरवठा निरीक्षण सुदर्शन दुर्योधन राधेश्याम पाटील समाधान माळी यांच्यासह विविध ग्राहक संघटनेचे पदाधिकारी व ग्राहक उपस्थित होते.
