प्रतिनिधी , बुलडाणा : खा.संजय राऊत यांनी 50 खोके घेणाऱ्या आमदारांची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावर बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते खासदार प्रतापराव जाधव यांनी खा.संजय राऊत यांना महाविकास आघाडी सरकार काळातील येणारे 100 खोकेची देखील SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी करावी, असा खोचक सल्ला दिला आहे. शिंदे गटातील आमदारांनी 50 कोटी घेतल्याचा थोडाही पुरावा असेल तर राऊतांनी सादर करावा, असे यावेळी खासदार जाधव म्हणाले आहेत.
