जनतेज न्युज

ऊसाची होळी पेटविण्याचा कार्यक्रम; आंदोलनाची थेट पत्रिका छापून निमंत्रण

प्रतिनिधी , बीड : आंदोलन करण्यासाठी छापलेली एक निमंत्रण पत्रिका सध्या बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथे शेतकरी संघर्ष समितीचे नेते गंगाभीषण थावरे आणि परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस मागील 25 महिन्यांपासून शेतातच उभा आहे. जय महेश साखर कारखान्या विरोधात शेतकरी संघर्ष समिती आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. आणि याच द्वेषा पोटी या शेतक-यांचा ऊस गाळपासाठी नेण्यात आला नाही. दरम्यान याच प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी थेट निमंत्रण पत्रिका छापण्यात आलीय. यामध्ये उसाची होळी करून ऊस पेटवून दिला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत अशा आशयाची ही निमंत्रण पत्रिका आहे.