जनतेज न्युज

पनवेल मध्ये क्रिकेट अकादमी ऑफ पठाणचे 33वे केंद्र सुरु

प्रतिनिधी , नवी मुंबई : माजी आंतरराष्ट्रीय अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण यांच्या क्रिकेट अकादमी ऑफ पठाणचे 33वे केंद्र पनवेल मधील कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी मध्ये सुरु करण्यात आली. या अकादमी मध्ये तंत्रज्ञान, ऑन-ग्राउंड अभ्यासक्रम, आंतरराष्ट्रीय क्रिकेट तज्ञांनी डिझाइन केलेले मॉडेलद्वारे विद्यार्थ्यांना सर्वोत्तम क्रिकेटचे धडे शिकवण्यात येणार आहेत. क्रिकेट अकादमी ऑफ पठाण संपूर्ण देशभरात 100 पेक्षा अधिक केंद्र सुरु करणार असून क्रिकेटपटून्ना व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याची प्रतिक्रिया माजी आंतराष्ट्रीय अस्टपैलू खेळाडू इरफान पठाण यांनी व्यक्त केली आहे.