प्रतिनिधी , मुंबई : नुरजहाँ अब्दुल समद शेख यांचं घर तोडू नये म्हणून त्या महानगरपालिका च्या विरुद्ध आपल्या कुटुंबासह आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. यांनी या कालावधीत महानगरपालिका तसेच वार्ड ऑफिस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्वांना निवेदनं दिली आहेत. गेल्या 40 वर्षापासून नूरजहाँ या घरामध्ये वास्तव्य करत आहेत. जसं घर आहे त्याच पद्धतीचं त्याच उंचीचं घर आहे असं त्यांनी त्यामध्ये नमूद केलेलं आहे महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी केलेल्या घोषणा त्यामध्ये अधिकृत असलेले हे घर आहे. तरीदेखील त्यांचं घर तोडण्याची कारवाई करत आहेत. त्यामुळे नूरजहाँ आपले हे घर न तोडण्याचे आम्ही सरकारकडे मागणी करत आहोत, असे रिपब्लिकन झोपडपट्टी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठलराव सोनवणे यांनी म्हटले आहे.
