जनतेज न्युज

भाजप आ. हरिभाऊ बागडे यांनी डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे घेतले दर्शन

प्रतिनिधी , नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बाग येथील स्मृति मंदिरात आज भाजपच्या आमदारांचा संघपदाधिकाऱ्याकडून अभ्यासवर्ग घेतला जाणार आहे, सकाळी 7:30 वाजता या अभ्यास वर्गाला सुरुवात होणार असून संघाचे जेष्ठ पदाधिकारी आमदारांना संघ परिचय आणि संघ भाजप समन्वय यावर मार्गदर्शन करतील. दोन तास हा अभ्यास वर्ग असणार आहे. आमदार स्मृती मंदिर मध्ये आद्य सरसंघचालक डॉ हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीला पुष्पांजली देखील अर्पण करतील.