प्रतिनिधी , जळगाव :पाचोरा शहरातील रेल्वे भुयारी मार्गात काही ठिकाणी खड्डे पडले असून मार्गातील चेंबर वरील तुटलेली जाळी ही किरकोळ अपघातांना आमंत्रण देणारी ठरत असुन गेल्या तीन दिवसांपासून ही जाळी तुटलेल्या अवस्थेत असुन याकडे मात्र नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे. पाचोरा शहराला जोळणारा राजे संभाजी महाराज रेल्वे भुयारी मार्गात काही ठिकाणी खड्डे पडले असल्याने हे खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे छोट्या मोठ्या अपघातांना वाहनधारकांना सामोरे जावे लागत असुन या भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचु नये म्हणून उजव्या व डाव्या बाजूला चेंबर बनविण्यात आले असुन त्या चेंबरवर लोखंडी जाळी बसविण्यात आली आहे. मात्र शहराकडुन महाराणा प्रताप चौकाकडे जातांना डाव्या बाजूस असलेली चेंबर वरील जाळी ही गेल्या चार दिवसांपासून तुटलेली आहे. ही जाळी तुटलेली असल्याने याठिकाणी मोटरसायकलचे तसेच शाळकरी मुलांचे किरकोळ अपघात घडत असुन अनेक वृद्ध, बालक हे जखमी देखील झाले आहे. मात्र याकडे नगरपालिका प्रशासनाने हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले असुन ही तुटलेली जाळी तात्काळ बदलण्यात यावी, अशी मागणी अनिल (आबा) येवले यांचेसह नागरिकांकडून तसेच शालेय विद्यार्थ्यांकडुन होत आहे.
