प्रतिनिधी , अमरावती : अमरावती मधल्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील १६ सफाई कामगारांसह वार्ड बॉय यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. सोबतच ९ महिन्यांचे वेतनही प्रलंबित आहेत. या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. 15 दिवसांमध्ये आंदोलकांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन आरोग्य विभागाकडून देण्यात आले. या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मागण्या जर 15 दिवसाच्या आत न झाल्यास तर प्रहार च्या स्टाईल मध्ये आंदोलन करणार असा इशारा प्रहार काढून देण्यात आला.
