जनतेज न्युज

भाकरी बनवण्याचे स्वावलंबी शिक्षण देणारा उपक्रम महानगरपालिका विद्यालयात आयोजित

प्रतिनिधी , औरंगाबाद : आज महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रियदर्शनी या शाळेत विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे मिळावेत या हेतूने शिक्षणाधिकारी संजीव सोनार यांच्या संकल्पनेतून शाळेत पुस्तकी शिक्षणाबरोबर स्वावलंबी शिक्षण देणारा उपक्रम ‘भाकरी बनवण्याची कला’ शाळेत आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमासाठी शाळेतील 50 मुल आणि मुलींनी सहभाग नोंदविल होता .शाळेमध्ये 25 चुली मांडून चुली पेटवून चुलीवर प्रत्यक्षात भाकरी तयार करण्यात आल्या.
मुलीबरोबरच मुलांनीही अतिशय सुरेख; कुरकरीत अशा भाकरी बनवताना पाहून सर्व कलावंतांना देखील आनंद झाला.विद्यार्थ्यांची आई आणि ताई करत असलेल्या कामाची जाणीव त्यांना व्हावी आपल्या आईला किती कष्ट पडतात याची जाणीव व्हावी तसेच आईने केलेली पोळी भाजी आपल्याला आवडली नाही तर आपण किरकिर करतो असे न करता ज्यावेळेस आपल्याला एकटे राहण्याचा प्रसंग येईल त्यावेळेस आपल्याला स्वयंपाक बनवता आला पाहिजे या भावनेतून या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले अशी माहिती शिक्षणाधिकारी संजीव सोनार यांनी दिली या उपक्रमाला शिवपुत्र संभाजी या नाटकाचे दिग्दर्शक लेखक व निर्माते कार्तिक राजाराम केंढे, नाट्यप्रकाश योजना भूषण देसाई, अभिनेते अजय तापकिरे, अभिनेते रमेश रोकडे, अभिनेते महेश कोकाटे व विश्वजीत पडते यांनी भेट देऊन मुलांचे कौतुक केले. याचबरोबर सर्व कलाकारांनी – मुलांनी बनवलेल्या या भाकरी सोबत पिठलं ,वांग्याची भाजी, ठेचा, पेरू बोर ,हरभरा या मेव्याचा आनंद घेतला. याचबरोबर शाळेत घेतलेल्या कार्यक्रमात कलाकारांनी मुलांशी मनसोक्त गप्पा मारल्यात. याप्रसंगी नाटकाचे निर्माते डॉक्टर घनश्याम राव यांनी महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमाबद्दल प्रशंसा केली व मनपाच्या पाचवी व आठवीच्या एकूण चारशे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप चे पुस्तके जगदंब क्रिएशनच्या वतीने देण्यात येतील असे सांगितले.