जनतेज न्युज

लोकांची अपेक्षा ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे विधानसभा चालत नाही – अरुण भाई गुजराती

प्रतिनिधी , जळगाव : नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या हिवाळी अधिवेशन मध्ये सुरू असलेल्या कामकाजाबद्दल माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले विधानसभेमध्ये प्रश्न सुटला पाहिजे हा महत्त्वाचा भाग आहे. जनतेची आशा आकांक्षा आहे त्यांचे ज्या प्रश्न समस्या आहेत त्या संदर्भाची चर्चा झाली पाहिजे. आता आपण जर पाहिलं तर त्या पद्धतीचे विधानसभा जी अपेक्षा आहे लोकांची तशी चालत नाहीये सत्ताधारी व विरोधी पक्षाचे लोक जे असतील त्यांनी जास्त विधानसभा लोकोपयोगी कशी होऊ शकेल समस्या प्रश्न कसे सुटतील राज्याची पुढची दिशा काय असली पाहिजे या संदर्भाची कारवाई अत्यंत महत्त्वाचे असल्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती यांनी विधानसभेमध्ये सुरू असलेल्या कामकाजाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.