जनतेज न्युज

परिवहन विभागातील सदस्यांची चौकशी करावी – काँग्रेसचे युवा नेता सलमान रिजवी

प्रतिनिधी , ठाणे : ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागातील अनेक राजकीय सदस्य कार्यरत असून काही सदस्यांनी राजकीय शक्तीचा दुरूयोग करून अपुऱ्या कागदत्रांद्वारे सदस्यपद मिळवले आहेत. त्यामूळे त्यांनी महापालिका आणि शासनाची फसवणुक केली असून अश्या सदस्यांची चौकशी करावी आणि फसवणुक केल्याप्रकरणी त्याच्यावर गून्हा दाखल करावी अशी मागणी ठाणे काँग्रेसचे युवा नेते सलमान रिजवी यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. ठाणे परिवहन सेवेमध्ये एकूण १२ सदस्य कार्यरत असून यातील राजकिय पक्षातील नेत्याचे कार्यकर्ते यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठाणे पालिका सदस्यांनी त्या पदाबाबत आवश्यक कागदपत्रे जमा न करता राजकीय शक्तीचा दुरुयोग करून अधिकाऱ्याशी साठगाठ ठेवून शासकीय पदाची गैरपद्धतीने फसवणूक केली असल्याचा आरोप रीजवी यांनी केली आहे. त्यामूळे अश्या सदस्यांनी चौकशी करून त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी सलमान रिजवी यांनी केली आहे.