प्रतिनिधी , बुलडाणा : रोजगार हमी योजनेच्या सार्वजनिक कामावरील २० पेक्षा कमी असलेल्या मजुरांचीही हजेरी आता मोबाईल अँपद्वारे घेण्यात येणार आहे, रोजगार सेवकांच्या माध्यमातून दिवसातून दोनदा ही हजेरी घेण्यात येणार असून, यामुळे कागदोपत्री घेण्यात येणाऱ्या बोगस हजेरीला आता आळा बसणार आहे.केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या मनरेगा विभागाने हा निर्णय घेतला असून सर्व राज्यांचे तथा केंद्रशासित प्रदेशांचे मनरेगा आयुक्त यांना यासंदर्भात सूचित करण्यात आले आहे, केंद्राने नवीन वर्षाच्या मुहूर्तावर अर्थात १ जानेवारी २०२३ पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश बजावले आहेत.
