प्रतिनिधी , अहमदनगर : नववर्षाच्या स्वागतासाठी संगमनेर मधील एका लॉन्स मध्ये एका इन्व्हरमेंट ग्रुपने युवक आणि युवतींसाठी इंस्टाग्राम वरील रिल्सस्टार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे, पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी एक मुखी मागणी सकल हिंदू समाजाने केली आहे. सदर कार्यक्रमाचे प्रवेश तिकीट महाविद्यालयात जाऊन युवक युवतींना देण्यात आले आहे. सदर इव्हेंट राबवताना त्यामध्ये अमली पदार्थांचे सेवन होऊन शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो ,त्यामुळे या शोला परवानगी देऊ नये अशी एक मुखी मागणी सकल हिंदू समाजाने केली आहे. पोलिसांनी सदरच्या इव्हेंटला कार्यक्रमाला परवानगी दिली तर त्या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम होऊ देणार नाही असा इशाराही सकल हिंदू समाजातील कार्यकर्त्यांनी दिला आहे.संगमनेर शहरासह महाराष्ट्रात लव जिहाद चे प्रकार घडत आहे. त्यामुळे पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होऊ लागली आहे. यासंदर्भात पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांना या कार्यकर्त्यांनी निवेदनही सादर केलं ,त्यानंतर पोलीस स्टेशनच्या आवारात त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, संगमनेर येथे होणाऱ्या या शोला विरोध पाहता पोलीस परवानगी न देण्याचे निर्णयापर्यंत आल्याची खात्रीलायक माहिती समजली आहे.
